Mumbai Breaking News : मुंबईत उद्योगपतीने स्वतःवर गोळ्या झाडून केली आत्महत्या
Mumbai Breaking News : मुंबईच्या जेजे मार्ग पोलीस ठाण्यानुसार, भिंडी बाजार परिसरात एका व्यावसायिकाने आपल्या कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
मुंबई :- मुंबईतील भिंडी बाजार परिसरात एका व्यावसायिकाने आपल्या कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. जेजे मार्ग पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शुक्रवारी (16 ऑगस्ट) दुपारी 2.45 च्या सुमारास 52 वर्षीय व्यापारी इक्बाल मोहम्मद सिवानी यांनी भिंडी बाजार भागातील अमीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या केली.
इक्बालने आत्महत्या केली तेव्हा कार्यालयातील इतर कर्मचारीही तेथे उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, इक्बाल मोहम्मद कर्जामुळे खूप त्रासलेला होता, त्याला व्यवसायात सतत तोटा होत होता त्यामुळे त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या जेजे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी ज्या कार्यालयातून मृत व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडली ते शस्त्रही जप्त केले. या प्रकरणी जेजे पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.