Mumbai Breaking News :बदलापुरात प्रशासनाने इंटरनेटवर बंदी घातली, तब्बल 10 तासानंतर रेल्वेसेवा सुरू
Mumbai Breaking News : निदर्शने करणाऱ्या सुमारे 300 लोकांवर एफआयआर, 40 हून अधिक जणांना अटक
बदलापूर :- आंदोलकांनी रेल्वे रुळ रिकामे केल्याने बदलापूर रेल्वे स्थानकावर काल (20 ऑगस्ट) सायंकाळी रेल्वेसेवा सुरू झाली. बदलापूर येथील एका शाळेत मुलीच्या लैंगिक छळाच्या निषेधार्थ काल सुमारे 10 तास रेल्वे स्टेशनच्या रुळांवर लोकांनी निदर्शने केली.
शाळेत दोन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी काल घडलेल्या घटनेच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या सुमारे 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
काल जिल्हा व पोलीस प्रशासनाने बदलापुरात इंटरनेट सेवा बंद केली. व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.बदलापूर प्रकरणात 10 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याची तयारी. या प्रकरणी शिंदे सरकारने तीन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
बदलापूर येथे दोन शाळकरी मुलींसोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेची महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. फडणवीस म्हणाले की, राज्य सरकारने तपासासाठी महानिरीक्षक दर्जाच्या भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आरती सिंग यांची नियुक्ती केली आहे.