Mumbai Road Accident News : मुंबईत दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना गोरेगाव येथे घडली. या अपघातात दुचाकीस्वार तिघेही जखमी झाले. दुसरा भीषण रस्ता अपघात चेंबूर येथे झाला.
मुंबई :- मुंबईत दोन वेगवेगळे गंभीर रस्ते अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. पहिली घटना गोरेगाव Mumbai Goregoan Road Accident येथे घडली. कॉलनी परिसरात दुचाकी खांबाला धडकली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही दुचाकीवरून जात होते. मुंडा चौकाजवळ अचानक दुचाकी खांबाला धडकली. खांबाला धडकल्याने दुचाकीवरील तिघेही जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांना रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. तिसऱ्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास करत आहेत.
दुसरा भीषण रस्ता अपघात चेंबूरच्या गव्हाणपाडा Mumbai Chembur Road Accident News भागात झाला. भरधाव वेगात असलेली टोयोटा दुभाजकाला धडकल्यानंतर दोन वेळा पलटी झाली. या अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेगाने वाहन चालवणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी तपास करत आहेत. ते त्याच परिसरात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…