मुंबई

Jio Tower Scam : देशभरात मोबाईल नेटवर्क गुल करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; JIO टॉवरची यंत्रे चोरणाऱ्या चौघांना अटक

•13 ठिकाणी टॉवर युनिट चोरीचे गुन्हे उघड; 56 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवी मुंबई | देशातील मोबाईल नेटवर्कवर परिणाम करणाऱ्या JIO कंपनीच्या 5G BASEBAND UNIT चोरणाऱ्या संघटित टोळीचा पर्दाफाश करत नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने एक मोठी कारवाई उघडकीस आणली आहे. या टोळीने खांदेश्वर, पनवेल, तळोजा ते मानखुर्द आणि रायगड जिल्ह्यात मिळून 13 ठिकाणी मोबाईल टॉवर युनिट चोरी केली होती.

JIO च्या 5G BASEBAND UNIT चोरांचा शिताफीने पाठलाग; पाडघा ते सटाणा दरम्यान सापळा रचून अटक या प्रकरणात चौघा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 56 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 12 मोबाईल टॉवर 5G BASEBAND UNIT, 3 मोबाईल फोन, आणि 3 चोरीसाठी वापरलेली वाहने यांचा समावेश आहे.

26 जून ते 6 जुलै 2025 या कालावधीत नवी मुंबईतील विविध भागांमध्ये 5G युनिट्स चोरी झाल्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, आणि अपर आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे यांनी यासंदर्भात तातडीने गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले.

दोन पथकांनी संयुक्तपणे मुंबई-आग्रा हायवेवरील पाडघा परिसरात तीन आरोपींना, तर चौथ्या आरोपीला सटाणा, नाशिक येथून ताब्यात घेतले.

अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे

1.मधुकर रमेश गायकवाड, वय 29, परभणी

2.अभिषेक दीपक काकडे, वय 24, परभणी

3.सौरभ सतीश मंजुळे, वय 24, पनवेल

4.दानिश इर्शाद मलिक, वय 22, मालेगाव, नाशिक

त्यांना 08 जुलै 2025 रोजी अटक करून 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमित काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात मध्यवर्ती कक्षाच्या पथकांनी सीसीटीव्ही फूटेज, खासगी व सरकारी कॅमेरे, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीचा वापर करून तपास पुढे नेला.

आरोपींकडून खालील ठिकाणचे 13 गुन्हे उघडकीस आले:

नवी मुंबई: खांदेश्वर, तळोजा, पनवेल

मिरा भाईंदर: मांडवी, माणिकपूर, नायगाव

ठाणे ग्रामीण: पडघा, कुळगाव

रायगड: अलिबाग, वडखळ

ठाणे शहर: बदलापूर

मुंबई: मानखुर्द

मुख्य आरोपी मधुकर रमेश गायकवाड याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत,नानलपेठ पो.स्टे., परभणी: चोरी व विश्वासघात,सहकारनगर, पुणे: मोबाईल चोरी,नवीन मोंढा, परभणी: महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून या टोळीने संघटित गुन्हेगारी कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर बीएनएस कलम 112 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक तुंगेनवार (तपास अधिकारी), सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश भोसले, तसेच पोलीस हवालदार संजय राणे, अनिल यादव, महेश ठाकूर, नितीन जगताप, आणि पोलीस नाईक टिके, ठाकूर, वाघ, काळे, पाटील, चव्हाण, पोलीस शिपाई भालेराव, पाईकराव, महिला पोलीस शिपाई पूजा वैद्य यांचा मोलाचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0