Mumbai Bomb Blast Threat Call Latest News : 34 वाहनांमध्ये 400 किलो RDX पेरल्याचा संदेश, गणेशोत्सवाच्या उत्साहात विघ्न; आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात
मुंबई :- अनंत चतुर्दशीच्या उत्साहात मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जन सुरू असताना शहराला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲपवर एक धमकीचा संदेश आला होता, ज्यात तब्बल 34 वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि 400 किलो RDX पेरल्याचा उल्लेख होता. या संदेशामुळे पोलीस प्रशासन तत्काळ सतर्क झाले आणि तपास यंत्रणांना पाचारण करण्यात आले. Mumbai Bomb Blast Threat Call
या गंभीर धमकीनंतर मुंबई पोलिसांकडून तातडीने तपास सुरू झाला. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर, हे विघ्न आता दूर झाले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असून त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जात आहे.
नोएडा पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा (वय 50) आहे. तो मूळचा बिहारचा असून गेल्या पाच वर्षांपासून नोएडामध्ये राहत होता. पोलिसांनी धमकी देण्यासाठी वापरलेला फोन आणि सिम कार्ड जप्त केले आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी आता मुंबई पोलीस करणार आहेत.
आरोपीने आपल्या संदेशात “लष्कर-ए-जिहादी” या संघटनेचे नाव वापरून भारतात 14 पाकिस्तानी दहशतवादी घुसल्याचा दावा केला होता. या बॉम्बस्फोटामुळे सुमारे एक कोटी लोक मारले जातील, असेही त्याने म्हटले होते. या संदेशामुळे मुंबईत मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे ही गंभीर धमकी आता निष्प्रभ झाली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…