Mumbai BMC Election News : मतदानासाठी पूर्ण दिवस सुट्टी किंवा किमान 3 तासांची सवलत अनिवार्य; तक्रारींसाठी पालिकेकडून दक्षता पथकाची स्थापना
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीची Mumbai BMC Election प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया गुरुवारी, 15 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या दिवशी मतदानाचा टक्का वाढावा आणि प्रत्येक नागरिकाला आपला हक्क बजावता यावा, यासाठी राज्य सरकारने मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, खासगी कंपन्या, आयटी पार्क आणि मॉल्सनी कर्मचाऱ्यांना सुट्टी न दिल्यास त्यांच्यावर पालिका प्रशासनाकडून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. Mumbai BMC Election Latest News
कोणाकोणाला ही सुट्टी लागू आहे?
महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार, ही सुट्टी खालील सर्व ठिकाणी लागू असेल.
केंद्र आणि राज्य शासनाची सर्व कार्यालये, निमशासकीय कार्यालये आणि बँका.
सर्व खासगी कंपन्या, कारखाने, दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने.
माहिती तंत्रज्ञान (IT) कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स आणि रिटेलर्स.
निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे आणि नाट्यगृहे.
अपवादात्मक परिस्थितीत 3 तासांची सवलत
ज्या आस्थापनांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही (उदा. आपत्कालीन सेवा किंवा धोकादायक प्रक्रिया असलेले कारखाने), अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची विशेष सवलत देणे बंधनकारक आहे. मात्र, यासाठी संबंधित कामगाराच्या पगारात कोणतीही कपात करता येणार नाही.
दक्षता पथकाची नजर आणि तक्रार क्रमांक
निवडणूक सुट्टीच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांसाठी विशेष दक्षता पथके तैनात केली आहेत. जर एखादी कंपनी किंवा दुकान मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत देण्यास नकार देत असेल, तर नागरिक खालील क्रमांकावर तक्रार करू शकतात:
📞 तक्रार दूरध्वनी क्रमांक: ९१२२-३१५३३१८७
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…