मुंबई

Mumbai BMC News : सत्तेसाठी काहीही? अकोटमध्ये भाजप-एमआयएम, तर अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेसची ‘हातमिळवणी’!

Devendra Fadnavis On Ambernath Yuti : देवेंद्र फडणवीस प्रचंड संतापले; “ही युती अजिबात खपवून घेणार नाही, दोषींवर कठोर कारवाई करणार” – फडणवीसांचा स्वपक्षीयांनाच इशारा

मुंबई | राज्यातील नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांनंतर सत्तेची समीकरणे जुळवताना भाजपने घेतलेल्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अकोटमध्ये थेट ‘एमआयएम’ (MIM) आणि अंबरनाथमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी ‘काँग्रेस’सोबत भाजपने युती केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी स्थानिक नेत्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलण्याचे संकेत दिले आहेत.

अकोटमध्ये ‘अकोट विकास मंच’चा प्रयोग

अकोट नगरपरिषदेत भाजपला सर्वाधिक 11 जागा मिळाल्या, मात्र बहुमताचा आकडा गाठण्यासाठी त्यांनी चक्क 5 जागा जिंकणाऱ्या ओवेसींच्या एमआयएमला सोबत घेतले आहे. याशिवाय यात शिंदे आणि ठाकरे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची प्रहार देखील सहभागी आहे. या नव्या ‘अकोट विकास मंच’ची नोंदणीही जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, आता सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना भाजपचा ‘व्हिप’ पाळावा लागणार आहे.

अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेलाच धक्का

अंबरनाथमध्ये तर भाजपने आपल्या मित्रपक्षालाच म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. येथे भाजपच्या तेजश्री करंजुले नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत, पण बहुमत मिळवण्यासाठी त्यांनी काँग्रेस (12 जागा) आणि अजित पवार गट (4 जागा) यांची मोट बांधली आहे. यावर शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी “ही अभद्र युती असून भाजपने शिवसेनेचा घात केला आहे,” अशी टोकदार टीका केली आहे.

“अशी युती खपवून घेणार नाही” – फडणवीस आक्रमक

या विचित्र युतीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,
“काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणत्याही प्रकारची युती भाजप कधीही खपवून घेणार नाही. स्थानिक पातळीवर जरी हे घडले असले, तरी ते पूर्णपणे चुकीचे आहे. ज्या कोणी नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी ही युती केली आहे, त्यांच्यावर पक्षपातळीवर कठोर कारवाई केली जाईल.”

नेमके राजकीय गणित काय?

अकोट: भाजप (11) + एमआयएम (5) + इतर = सत्ता स्थापनेचा प्रयत्न.

अंबरनाथ: भाजप (16) + काँग्रेस (12) + राष्ट्रवादी-अजित पवार (4) = 32 (बहुमत 30 पेक्षा जास्त).

एकीकडे ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा देणारा भाजप स्थानिक पातळीवर सत्तेसाठी काँग्रेस आणि एमआयएमसारख्या पक्षांच्या ‘शेजेवर’ गेल्याने विरोधकांनी आता भाजपच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. येत्या 13 जानेवारीला होणाऱ्या उपनगराध्यक्ष निवडीत ही समीकरणे कशी टिकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

3 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago