Mumbai BMC News : मुंबईत भ्रष्टाचाराला धडा! BMCच्या स्वच्छता निरीक्षकाला 2 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

Mumbai BMC Officer Taking Bribe : सांताक्रुजमधील पॅलेडियम कॅफेटेरिया परवाना प्रकरणातून सापळा रचून जाळा ; परवाना मिळवून देण्यासाठी मागितले पाच लाख
मुंबई :- सांताक्रुज येथील एका कॅफेटेरियासाठी आवश्यक परवाना मिळवून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सार्वजनिक आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षकाने तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Mumbai BMC Officer Taking Bribe विशेष म्हणजे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (ACB) सापळा रचत संबंधित अधिकाऱ्याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. Mumbai Latest Bribe Case
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सरबजीतसिंह बाजवा (वय 57) असे असून, ते सांताक्रुज पूर्व विभागात स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तक्रारदार महिला या कन्सल्टंट असून त्यांच्या क्लायंटच्या कॅफेटेरियासाठी आवश्यक परवाना घेण्याच्या प्रक्रियेसाठी अर्ज करण्यात आला होता. सदर अर्ज मान्य करून परवाना देण्यासाठी बाजवा यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती.
त्यानुसार तक्रारदारांनी 11 एप्रिल 2025 रोजी दोन लाख रुपये आधीच दिले होते. उर्वरित दोन लाख रुपये 5 जून 2025 रोजी देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बाजवा यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई चंद्रकांत माळी सहाय्यक पोलीस आयुक्त, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल आणि मार्गदर्शक अधिकारी संदीप दिवाण, अनिल घेरडीकर व राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.



