Mumbai BMC Election Latest Update : अमित साटम यांच्या टीकेनंतर शिवसेना (उबाठा) आणि मनसे आक्रमक; ‘मराठी महापौर शिवसेनेचाच असेल’, संजय राऊतांचा पलटवार,‘खान’ची भीती दाखवून ‘भैय्या-गुज्जु’ महापौर करण्याचा कट? भाजपच्या नवनाथ बान यांचाही शिवसेना-मनसेला टोला
मुंबई :- पाच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागताच मुंबईतील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, भाजपने केलेल्या एका वक्तव्याने मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. Mumbai Latest News
वरळी डोम येथे एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. “जर ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली, तर महापौर ‘खान’ असेल,” असे वक्तव्य त्यांनी केले. यानंतर शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांचा पलटवार
अमित साटम यांच्या वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केले? आरिफ मोहम्मद खानांना पदे कुणी दिली? या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत भाजप नव्हता. पण मुस्लिम समाज होता. अमित साटम यांनी याबाबत जरा अभ्यास करावा,” असे राऊत म्हणाले. तसेच, “मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो शिवसेनेचा असेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मनसे आणि भाजपमध्येही शाब्दिक युद्ध
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या वादात उडी घेत भाजपवर निशाणा साधला. “मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे. ‘खान’ची भीती दाखवून ‘भैय्या’ आणि ‘गुज्जु’ महापौर करण्याचा कट उधळून लावणार,” असे ते म्हणाले.
याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते नवनाथ बान म्हणाले, “मराठी माणसाच्या हक्कांसाठी भाजपने नेहमीच लढा दिला आहे. त्यामुळे आम्हाला कुणाकडून काही शिकायची गरज नाही. पतपेढीच्या निवडणुकीत कोण जिंकले आणि कोण हळकुंडाने पिवळे झाले, हे मुंबईकरांनी पाहिले आहे. महापालिका निवडणुकीत मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही, तर तो विकासाला मत देणार आहे. त्यामुळे महापौर मराठीच होईल, पण तो भाजप-महायुतीचा असेल.”
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…