मुंबई

Mumbai BMC Election :,मुंबई महापालिकेत राडा! नार्वेकर-हरिभाऊ राठोड भिडले; धमकी आणि धक्काबुक्कीच्या आरोपांनी कुलाब्याचे राजकीय वातावरण तापले

Mumbai BMC Election Update : हरिभाऊ राठोड तिथे पूजा करायला गेले होते का?”; नार्वेकरांचा पलटवार; पराभव समोर दिसत असल्यानेच केविलवाणे आरोप

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या Mumbai BMC Election अर्ज प्रक्रियेदरम्यान कुलाबा येथील निवडणूक कार्यालयात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narvekar आणि हरिभाऊ राठोड Haribhau Rathod यांच्यात मोठा वाद झाला. नार्वेकर यांनी आपल्याला धमकी दिली आणि सुरक्षा रक्षकांचा रुबाब दाखवला, असा आरोप राठोड यांनी केला आहे. तर, राठोड आणि त्यांच्या टोळीने आपल्याला घेराव घालून धक्काबुक्की केली, असा प्रतिआरोप राहुल नार्वेकर यांनी केला आहे.

हरिभाऊ राठोड यांचे आरोप

हरिभाऊ राठोड यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवला आहे. “नार्वेकर सायंकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात फेऱ्या मारत होते. त्यांनी मला विचारले की तुम्हाला सिक्युरिटी कोणी दिली? त्यांनी मला चक्क धमकी दिली,” असा दावा राठोड यांनी केला. विधानसभा अध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण आणि पलटवार

आपल्यावरील आरोप फेटाळताना राहुल नार्वेकर यांनी हरिभाऊ राठोड यांच्यावरच तोफ डागली. नार्वेकर म्हणाले की, “मुंबईतील 36 आमदारांप्रमाणे मी सुद्धा माझ्या मतदारसंघातील उमेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी गेलो होतो. कार्यकर्त्याला आपला नेता सोबत असावा असे वाटते आणि त्यात काहीही गैर नाही.” “निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारासोबत केवळ दोन व्यक्तींना परवानगी असते, त्या नियमाचे आम्ही पालन केले.” “मी आरओ (RO) ऑफिसमधून बाहेर येत असताना हरिभाऊ राठोड आणि त्यांच्यासोबत आलेल्या टोळीने मला घेरले आणि धक्काबुक्की केली. विधानसभा अध्यक्षांना अशा प्रकारे घेराव घालणे हा सुरक्षेचा दुरुपयोग नाही का?”

संविधानाचा भंग कोणी केला?

नार्वेकर यांनी विचारले की, “जर मी पोलिंग स्टेशनवर गेलो तर ते अनुचित होते, मग हरिभाऊ राठोड तिकडे पूजा करायला गेले होते का? आरओ अधिकाऱ्यांना बाहेर पडू न देण्याची आणि त्यांना अडवून ठेवण्याची भाषा राठोड यांच्याकडून केली जात होती.” आपला पराभव स्पष्ट दिसत असल्यानेच राठोड असे हास्यास्पद आरोप करत असल्याचे त्यांनी शेवटी म्हटले.

vivek

Recent Posts