मुंबईठाणे
Trending

Mumbai BMC Election : मुंबई मनपासाठी महायुतीचे ‘मिशन 150’! भाजप-शिंदे गटात 150 जागांवर एकमत; 77 जागांचा पेच दोन दिवसांत सुटणार

Amit Satam On Uddhav Thackeray : “मुंबई विकून खाणाऱ्यांना घरी बसवणार”; भाजप नेते अमित साटम यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट प्रहार

मुंबई | आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाची दुसरी महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात एकूण 150 जागांवर एकमत झाले आहे. भाजप नेते आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महायुती सर्व 227 जागांवर लढणार असून, उर्वरित 77 जागांबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जागावाटपाचा फॉर्म्युला

‘भ्रष्टाचारमुक्त मुंबई’ जागावाटपाच्या गणितापेक्षा ‘भ्रष्टाचारमुक्ती’ हेच महायुतीचे मुख्य सूत्र असल्याचे अमित साटम यांनी सांगितले. ते म्हणाले, “आमचा फॉर्म्युला स्पष्ट आहे – मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढणे. गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिका ज्यांनी विकून खाल्ली, त्यांना पराभूत करणे हे आमचे लक्ष्य आहे. महायुतीचे 150 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल.”

उर्वरित 77 जागांचे काय?

उर्वरित 77 जागांवर येत्या दोन दिवसांत चर्चा पूर्ण होईल. दोन्ही पक्षांकडून आपापली आकडेवारी आणि मतदारसंघांचा आढावा सादर केला जाईल. यानंतर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या यापेक्षा ‘महायुती’ म्हणून 227 जागा लढवणे हे महत्त्वाचे असल्याचे साटम यांनी आवर्जून नमूद केले.

“मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न हाणून पाडणार” ठाकरे गटावर टीका करताना अमित साटम म्हणाले की, “काही लोक मतांच्या लांगूलचालनासाठी मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे राजकीय अस्तित्व संपत आल्याने ते अशा प्रकारचे प्रयत्न करत आहेत. मात्र, मुंबईचा विकास, सुरक्षितता आणि अस्मिता जपण्यासाठी मुंबईकर महायुतीलाच कौल देतील.”

उदय सामंत यांची ग्वाही यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही भाजपच्या भूमिकेला दुजोरा दिला. “आमची आणि भाजपची भूमिका एकच आहे. 150 जागांवर एकमत झाले असून उर्वरित जागांबाबतही सकारात्मक चर्चा सुरू आहे. जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर होईल, तेव्हा विरोधकांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील,” असे सामंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0