ठाणे

Mumbai BMC Election : मुंबईत ‘एबी फॉर्म’चे वाटप सुरू; भाजपा, ठाकरे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर!

Mumbai BMC Election Latest News : भाजपाकडून जुन्या-नव्यांचा मेळ, मलिकांच्या कुटुंबाला तिहेरी संधी; तर ठाकरे गटाचा 70% नव्या चेहऱ्यांवर भर

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai BMC Election 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईच्या सत्तेचा ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी भाजपाने शंभराहून अधिक उमेदवारांची तयारी पूर्ण केली असून, शिवसेना ठाकरे गटानेही आक्रमकपणे उमेदवारी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी अजित पवार गटाने मुंबईत ‘स्वबळा’चा नारा देत आपली 37 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. Mumbai BMC Election Latest News

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: प्रमुख पक्षांची उमेदवार यादी

1.भारतीय जनता पक्ष (BJP) भाजपाने अनेक माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली असून काही नव्या चेहऱ्यांनाही मैदानात उतरवले आहे.

नील सोमय्या: प्रभाग क्र. १०७

तेजिंदर सिंग तिवाना: प्रभाग क्र. ४७

तेजस्वी घोसाळकर: प्रभाग क्र. २

शिवानंद शेट्टी: प्रभाग क्र. ९

नवनाथ बन: प्रभाग क्र. १३५

संतोष ढाले: प्रभाग क्र. २१५

स्नेहल तेंडुलकर: प्रभाग क्र. २१८

अजय पाटील: प्रभाग क्र. २१४

सन्नी सानप: प्रभाग क्र. २१९

2.शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT)

ठाकरे गटाने आपल्या अनेक जुन्या फौजेवर विश्वास दाखवला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेशी युती झाल्यामुळे अनेक जागांवर समन्वय पाहायला मिळत आहे.

अंकित प्रभू: प्रभाग क्र. ५४

शैलेश फणसे: प्रभाग क्र. ५९

मेघना विशाल काकडे माने: प्रभाग क्र. ६०

देवेंद्र (बाळा) आंबेरकर: प्रभाग क्र. ६३

विठ्ठल लोकरे: प्रभाग क्र. १४१

सुनंदा लोकरे: प्रभाग क्र. १४२

सुप्रदा फातर्फेकर: प्रभाग क्र. १५०

साईनाथ साधू कटके: प्रभाग क्र. १६४

सचिन पडवळ: प्रभाग क्र. २०६

किरण बाळसराफ: प्रभाग क्र. २१५

3.राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट (NCP Ajit Pawar)

अजित पवार गटाने मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबातील ३ जणांना संधी मिळाली आहे.

अब्दुल रशीद (कप्तान) मलिक: प्रभाग क्र. १६५

डॉ. सईदा खान: प्रभाग क्र. १६८ (नवाब मलिक यांची बहीण)

बुशरा परवीन मलिक: प्रभाग क्र. १७० (कप्तान मलिक यांची सून)

मनिष दुबे: प्रभाग क्र. ३

धनंजय पिसाळ: प्रभाग क्र. १११

सिरील पिटर डिसोझा: प्रभाग क्र. ४८

अहमद खान: प्रभाग क्र. ६२

4.समाजवादी पार्टी (SP)

अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षानेही आपली २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

मोहम्मद अजहरुद्दीन सिद्दीकी: प्रभाग क्र. २०

डॉ. शीला अखिलेश यादव: प्रभाग क्र. ६४

रुबाबा नाजीन सिद्दीकी: प्रभाग क्र. १३६

अमरीन शहज़ाद अब्दुल्ला: प्रभाग क्र. २१२

सचिन तांबे: प्रभाग क्र. ९३

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

37 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago