Shilpa Keluskar Latest News : शिंदेंच्या सेनेला धूळ चारली; १७२२ मतांनी मारली बाजी
मुंबई | प्रभाग १७३ मधील लढत ही वैयक्तिक चुरशीपेक्षा राजकीय ‘नाट्या’मुळे राज्यभर गाजली होती. भाजपचा अधिकृत पाठिंबा नसतानाही केवळ ‘कलर झेरॉक्स’ एबी फॉर्मच्या जोरावर रिंगणात उतरलेल्या शिल्पा केळुसकर यांनी १७२२ मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवार पूजा कांबळे यांचा पराभव केला.
काय होता नेमका ‘एबी फॉर्म’ वाद?
जागावाटपाचा तिढा: महायुतीच्या जागावाटपात हा प्रभाग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटला होता. त्यामुळे भाजपने शिल्पा केळुसकर यांना दिलेला ‘एबी फॉर्म’ परत मागवला होता.
कलर झेरॉक्सचा डाव: शिल्पा केळुसकर यांनी तो फॉर्म परत देण्यापूर्वी त्याची कलर झेरॉक्स काढून ठेवली आणि तीच झेरॉक्स जोडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपची तक्रार: मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि अमित साटम यांनी या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली होती आणि केळुसकर यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव आयोगाने त्यांचा अर्ज ग्राह्य धरला होता.
‘५० खोके’ विरुद्ध ‘एबी फॉर्म चोर’
निवडणूक प्रचारादरम्यान या प्रभागात अत्यंत टोकाची टीका पाहायला मिळाली होती. केळुसकर यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या उमेदवारासमोर ‘५० खोके एकदम ओक्के’ अशा घोषणा दिल्या होत्या, तर प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केळुसकर यांचा उल्लेख ‘एबी फॉर्म चोर’ असा केला होता. मात्र, मतदारांनी केळुसकर यांच्या बाजूने कौल दिल्याने शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
शिवसेना (UBT) ची भूमिका
विशेष म्हणजे, या प्रभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केळुसकर यांना छुप्या पद्धतीने मदत केल्याची चर्चा होती. “ज्यांनी गद्दारी केली, त्यांना धडा शिकवण्यासाठी जनतेने हा निकाल दिला आहे,” अशी प्रतिक्रिया विजयानंतर केळुसकर समर्थकांनी दिली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…