Mumbai BMC : ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामरा यांचा शो शूट झाला होता, त्याच स्टुडिओवर बीएमसीने हातोडा मारला.

Mumbai BMC On Kunal Kamara Show : ज्या स्टुडिओमध्ये कुणाल कामराने शो केला होता तो पाडण्यासाठी बीएमसीची टीम पोहोचली. कामरा यांनी त्यांच्या शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ताशेरे ओढले होते.
मुंबई :– कॉमेडियन कुणाल कामरा Kunal Kamra याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर केलेल्या टोमणावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कुणाल कामराने ज्या स्टुडिओमध्ये व्हिडिओ शूट केला होता Mumbai BMC On Kunal Kamara Show त्या स्टुडिओवर हातोडा मारला आहे. बीएमसीची टीम हातोडा घेऊन स्टुडिओत पोहोचली होती.
यापूर्वी मंत्री आणि शिवसेना नेते प्रताप सरनाईक म्हणाले की, कुणाल कामरा यांनी ज्या स्टुडिओमध्ये शिवसेनेवर भाष्य केले तो स्टुडिओ बेकायदेशीर असून त्यावर बुलडोझरची कारवाई करण्यात यावी, यासाठी मी बीएमसी आयुक्तांशी बोललो आहे.
रविवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी खार परिसरातील हॉटेल युनिकॉन्टिनेंटलच्या बाहेर जमून क्लब आणि हॉटेलच्या परिसराची तोडफोड केली. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या वादग्रस्त शोचे शूटिंग ‘हॅबिटॅट क्लब’मध्येच झाले होते. या शोमध्ये शिवीगाळ करण्यासोबतच असभ्य कमेंटही करण्यात आल्या होत्या.