महाराष्ट्रमुंबई
Trending

Mumbai BJP News : महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेचे निवासी संपादक “विवेक जगताप” ( Vivek Rajendra Jagtap )यांची भारतीय जनता पार्टीच्या “महाराष्ट्र प्रदेश चित्रपट कामगार आघाडीच्या सरचिटणीस” पदी नियुक्ती

Mumbai BJP Latest News : संघटित आणि असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सदैव तत्पर्य असेल ; विवेक जगताप

मुंबई :- राज्यात महायुतीचे म्हणजेच भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) सरकार स्थापन झाले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. Mumbai BJP भाजप विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांना आपल्या पक्षात सामावून घेऊन संधी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेचे संपादक विवेक राजेंद्र जगताप (Vivek Rajendra Jagtap) यांची भारतीय जनता पार्टी यांच्या सरचिटणीस ,महाराष्ट्र प्रदेश चित्रपट कामगार आघाडी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष कामगार मोर्चा विजय हरगुडे यांच्या आदेशाने विवेक राजेंद्र जगताप ( Vivek Rajendra Jagtap ) यांची सरचिटणीस पदी वर्णी लागली आहे.

भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे , चित्रपट आघाडी प्रदेशाध्यक्ष समीर दीक्षित, नितीन कोदे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी चित्रपट आघाडी, सहप्रभारी राकेश सनस महाराष्ट्र प्रदेश, यांच्या हस्ते विवेक जगताप ( Vivek Rajendra Jagtap) यांची नियुक्ती करून त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय नेतृत्व यांच्या कार्यशैलीला प्रेरित होऊन भाजपामध्ये प्रवेश केला आहे. संघटित,असंघटित आणि श्रमिक कामगारांना न्याय हक्कांसाठी शासन दरबारी आवाज उठवून प्रश्न सोडवुण्यासाठी अग्रेसर असेल असे प्रतिपादक पक्षाने दिलेल्या जबाबदारीनंतर विवेक जगताप यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0