Mumbai Malad Activa Bike Robbery Case : 50 सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन रात्रींचा पाळत; मालाड, जोगेश्वरी व व्ही.व्ही. नगरमधील वाहन चोरीचे गुन्हे उघड
मुंबई/मालाड | मुंबईच्या पश्चिम उपनगरातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात मालाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश आले आहे. केवळ 18 वर्षे वय असलेल्या या आरोपीने गेल्या पाच-सहा महिन्यांत मालाड, जोगेश्वरी आणि विनोबा भावे नगर परिसरात धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला मालवणी परिसरातून अटक करून 3 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 5 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. Mumbai Malad Bike Robbery Case
एका चोरीने उघडले गुन्ह्यांचे धागेदोरे
20 डिसेंबर 2025 रोजी मालाड पश्चिम येथील क्लाउड नाईन हॉस्पिटलसमोरील गल्लीतून एक ‘ॲक्टिव्हा’ दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळापासून चोरट्याने ज्या मार्गाने पळ काढला, त्या मार्गावरील तब्बल 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
मालवणीच्या दिशेने जाताना दिसला संशयित
सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले असता, प्रत्येक वेळी ‘होन्डा ॲक्टिव्हा’ चोरणारा इसम एकच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनाचे आले. तो चोरीची गाडी घेऊन मालवणीच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन दिवस आणि दोन रात्री पोलिसांनी मालवणी परिसरात सापळा रचला. खास खबऱ्यांच्या मदतीने पाळत ठेवली असता, 18 वर्षीय प्रथम सुरेंद्र बोम्मा हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पाच महिन्यात अनेक गाड्यांवर मारला डल्ला
आरोपी प्रथम बोम्मा याने गेल्या 5-6 महिन्यांत मालाडमधून दोन, विनोबा भावे नगरमधून एक आणि जोगेश्वरी परिसरातून एक अशा अनेक गाड्या चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी 5 सिल्व्हर, पांढऱ्या आणि ग्रे रंगाच्या ॲक्टिव्हा स्कूटर्स जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे मालाड, जोगेश्वरी आणि विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यांतील एकूण चार गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे.
पोलिस पथकाची कौतुकास्पद कामगिरी
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शशि कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त संदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे यांच्यासह अंमलदार संतोष सातवसे, अमित गावड, अविनाश जाधव, महेश डोईफोडे आणि वैभव थोरात यांचा समावेश होता.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…