Mumbai BEST Bus Accident : कुर्ल्यात बेस्ट बसने वाहनांना धडक दिली, 3 ठार, 20 जखमी
•कुर्ल्यात बेस्ट बसचा कहर पाहायला मिळाला. बसने अनेक वाहनांना धडक दिली आणि काही लोकांना चिरडले. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले.
मुंबई :- कुर्ला परिसरात बेस्टच्या बसला अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या बसने इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला, तर 20 जण जखमी झाले. या जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पावणेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एल वॉर्डसमोर एसजी बर्वे मार्गावर बेस्टच्या बसची अनेक वाहनांना धडक बसली.कुर्ला भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती तपासली जात आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.
भाभा हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार, अनियंत्रित बसने झालेल्या या अपघातात सुमारे 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. काही रुग्णांना सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठा जमाव रस्त्यावर आला आहे. या जमावाला पांगवण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
या घटनेबाबत आमदार महेश कुडाळकर म्हणाले, “मी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी करत आहे. अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.रुग्णांना मदत करणे महत्वाचे आहे. जवळपास 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. काही लोकांचा मृत्यूही झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी. सर्व जखमींना महापालिकेच्या बाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.