मुंबई : लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात

Mumbai Police Officer Bribe News : गुन्ह्यात मदत करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील देसाई (52 वय) आणि पोलीस शिपाई विक्रम शेंडगे (31 वय) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती.
मुंबई :- मुंबईच्या एम एच बी पोलीस ठाणे, बोरिवली येथे अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला Mumbai Police Officer Bribe News असून गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी आणि आरोपीच्या कार सोडवण्याकरिता 35 हजार रुपयांची मागणी करून तडजोडअंती 20 हजार रुपये स्वीकारताना एम एस बी पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपाई यांना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. Borivali Police officer bribe news
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे विरुध्द 16 मार्च 25 रोजी एम एच बी पोलिस ठाणे येथे अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.गुन्हयात आरोपीला मदत करण्यासाठी व आरोपी ची चार चाकी गाडी सोडवण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील देसाई यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने दिनांक 18 मार्च रोजी रोजी त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे तक्रार अर्ज दिला होता. तक्रारीवरून 18 मार्च रोजी पडताळणी करण्यात आली आहे. पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील देसाई यांचे सांगण्यावरून पोलीस शिपाई विक्रम शेंडगे यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमन 1988 कलम 7,12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. Borivali Police officer bribe news
ही कारवाई संदीप दिवाण अपर पोलिस आयुक्त,ला.प्र.वि, मुंबई अनिल घेरडीकर अपर पोलीस उप आयुक्त,ला.प्र. वि, मुंबई,राजेंद्र सांगळे अपर पोलीस उप आयुक्त,ला.प्र. वि, मुंबई मनीषा झेंडे सहायक पोलीस आयुक्त प्रशासन यांच्या मार्गदर्शनाखाली निता भोसले पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि.,बृहन्मुंबई,शिरीष माणगावे स.पो.नि.ला.प्र. वि .मुंबई