Mumbai Aray Colony Robbery Case : फसवणूक करून निर्जन स्थळी आणले; आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश; मुख्य आरोपीवर पूर्वीचेही 5 गुन्हे दाखल
मुंबई :- आरे पोलीस ठाण्याच्या Aray Colony Police हद्दीत एका व्यापाऱ्याला फसवून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून सोन्याची चैन जबरीने चोरणाऱ्या आणि दुखापत करणाऱ्या एकूण 04 आरोपींना आरे पोलिसांनी केवळ 07 तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींकडून चोरीची चैन, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि ऑटो रिक्षा असा एकूण 10.50 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Mumbai Latest Robbery Case
काय आहे नेमके प्रकरण?
देवनार, मुंबई येथील रहिवासी असलेले मोहम्मद हनीफ साबुला खान (वय 45) यांना 23/11 रोजी सायंकाळी 4.30 ते 5.30 वाजेच्या दरम्यान आरोपींनी फसवून आरे कॉलनीतील निर्जन स्थळी आणले.
फिर्यादींना घरी जायचे असताना ‘सायरा’ नावाची महिला आणि एका अनोळखी ऑटो रिक्षाचालकाने संगनमत करून त्यांना आरे डेअरीच्या पाठीमागील रस्त्यावर आणले. तिथे त्यांनी मोटारसायकलवरील त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांना बोलावून घेतले.
आरोपींनी फिर्यादींच्या गळ्यातील पाच लाखांच्या किंमतीची सोन्याची चैन जबरीने खेचून चोरली. विरोध केल्यावर त्यांनी फिर्यादींच्या डोळ्यात लाल मिरची पावडर टाकून त्यांना जखमी केले आणि भरधाव वेगाने पळून गेले. फिर्यादीने तत्काळ आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
07 तासांत आरोपी जेरबंद
गुन्हा दाखल होताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ आणि पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळ आणि परिसरातील 17 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, आरोपींचे चेहरे अस्पष्ट दिसत होते.पोलिसांनी कौशल्यपूर्वक तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने जलद गतीने तपास केला आणि केवळ 07 तासांच्या आत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आरोपींना अटक केली
विशाल सिध्दार्थ वाघ (वय 27)
2.नमेश नागेश सुर्वे (वय 23)
3.जहागीर सल्लाउदीन कुरेशी (वय 25)
4.शहरीन औरंगजेब कुरेशी (महिला, वय 24)
गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटक आरोपींपैकी विशाल सिध्दार्थ वाघ (वय 27 वर्षे) याच्यावर यापूर्वी डोंबिवली पोलीस ठाण्यात जबरी चोरी, मारामारी आणि धमकी दिल्याप्रकरणी 05 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरे पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली.
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…