मुंबई

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावर दुर्मीळ साप-कासवांची तस्करी उघड

Mumbai Airport Latest News : सीमाशुल्क अधिकाऱ्यांची तत्परता; 47 साप, 5 कासवांसह एकजण अटकेत

मुंबई :- मुंबई विमानतळावर शनिवारी (31 मे) रोजी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई करत दुर्मीळ प्रजातींच्या साप आणि कासवांची तस्करी उघडकीस आणली. टीजी 317 क्रमांकाच्या विमानातून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल 47 साप आणि 5 कासव जप्त करण्यात आले. Mumbai Airport Latest News या व्यक्तीला अधिकाऱ्यांनी त्वरित अटक केली असून, यामध्ये स्पायडर टेल्ड हॉर्न्ड वायपर, इंडोनेशियन पिट वायपर आणि एशियन लीफ टर्टल या प्रजातींचा समावेश आहे.

तपासणीदरम्यान संबंधित व्यक्तीची हालचाल संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी त्याचे सामान चाळून पाहिले. यामध्ये 3 स्पायडर टेल्ड हॉर्न्ड वायपर साप, तसेच 5 एशियन लीफ टर्टल कासव लपवून ठेवलेले आढळले. याशिवाय, 44 इंडोनेशियन पिट वायपर साप, त्यातील एक मृतावस्थेत, असे मोठ्या प्रमाणात जीवजंतू सापडले. हे सर्व जीवजंतू अत्यंत दुर्मीळ असून, त्यांच्या तस्करीवर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार बंदी आहे.

या कारवाईनंतर रविवारी अधिकाऱ्यांनी पंचनामा करत सर्व जीवजंतू जप्त केले. अटक केलेल्या व्यक्तीवर सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे वन्यजीव तस्करीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago