क्राईम न्यूज

Mumbai Airport News : मुंबई विमानतळावर 33 कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोन दिवसांत 8 तस्कर अटकेत

Mumbai Latest Crime News : बँकॉक व मलेशियातून आली होती अमली चढ; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

मुंबई | मुंबई विमानतळावर Mumbai Airport Drug Trafficking सीमाशुल्क विभागाने दोन दिवसांत केलेल्या धडाकेबाज कारवायांमध्ये तब्बल 33 किलो ‘हायड्रो गांजा’ जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 33 कोटी रुपये असून, याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेत आलेल्यांमध्ये सात प्रवासी आणि विमानतळाबाहेर अमली पदार्थ घेण्यासाठी आलेला एक जण यांचा समावेश आहे.

ही तस्करी बँकॉक (थायलंड) आणि मलेशिया येथून करण्यात आली होती. तस्करांनी ट्रॉली बॅगमध्ये अत्यंत कुशलतेने गांजा लपवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीमाशुल्क विभागाने विशेष तपासणी उपकरणांचा वापर करत सर्व अंमली पदार्थ शोधून काढले. या मोहिमेत मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांत वेगवेगळ्या सहा प्रकरणांमध्ये कारवाई झाली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींवर अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार (NDPS Act) गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांत हायड्रोपोनिक गांजा अर्थात हायड्रो गांजाची मागणी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली असून, तस्करांनी भारतात त्याची तस्करी सुरू केली आहे. मुंबईसह अन्य शहरांमध्ये स्थानिक पोलीस व अमली पदार्थ विरोधी पथक यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली आहे.

विधानसभेच्या चालू पावसाळी अधिवेशनात हायड्रो गांजाच्या वाढत्या साखळीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात स्पष्ट केलं की, अशा तस्करांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago