Mumbai Ahmedabad Accident News : मुंबई-अहमदाबाद द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, पालघरमध्ये पुलावरून तेलाचा टँकर पडला

Mumbai Ahmedabad Accident News : मुंबई-अहमदाबाद द्रुतगती मार्गावर एक तेलाचा टँकर थेट उड्डाणपुलावरून पडला. यामुळे भीषण अपघात झाला. एक्स्प्रेस वेवरील मस्तान नाका परिसरात ही घटना घडली. अपघातानंतर या टँकरमधून मोठ्या प्रमाणात तेलाची गळती सुरू झाली. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पालघर :- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तेलाने भरलेला टँकर मुंबईहून गुजरातकडे जात होता. Mumbai Ahmedabad Accident News राष्ट्रीय महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलावर चालकाचे टँकरवरील ताबा सुटल्याने अनियंत्रित टँकर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून पंधरा ते वीस फूट उंचीवरून थेट पुलाखाली कोसळला.यावेळी सुदैवाने टँकर पडला. त्यावेळी उड्डाणपुलाखाली एकही वाहन किंवा व्यक्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
30 हजार लिटरचा टँकर उड्डाणपुलावरून पडल्यानंतर तेलाची गळती सुरू झाली. त्यामुळे संपूर्ण परिसरात रस्त्यावर तेल सांडले. तेलगळतीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला.अपघातग्रस्त टँकरमधून त्यांना बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान टँकर चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण टँकरमध्ये भरलेले कच्चे तेल ज्वलनशील नव्हते. दोन क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त टँकर रस्त्यावरून हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.


