Mumbai Jogeshwari Vikhroli Link Road Accident News : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर घटना, लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला
मुंबई :- मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर Mumbai Jogeshwari Vikhroli Link Road Accident आज सकाळी एक भीषण अपघात घडला. पवई आयआयटीजवळ बेस्ट बसने दोन तरुणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी आहे.
मृत तरुणाचे नाव देवांश पटेल (वय 22, रा. जोगेश्वरी) असून, जखमी झालेला त्याचा मित्र स्वप्नील विश्वकर्मा (वय 22) आहे. स्वप्नील याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोन्ही तरुण लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन परत येत असताना हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघाताची नेमकी कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, पण पोलिसांनी ती लवकरच सुरळीत केली.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…