मुंबई

Mumbai Accident News : भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; फरार दुचाकीस्वाराचा सांताक्रूझ पोलीस शोध घेत आहेत

Mumbai Juhu Tara Road Accident News : जुहू तारा रस्त्यावर घडली घटना; उपचाराअभावी पादचाऱ्याने गमावला जीव

मुंबई :- सांताक्रूझ येथील जुहू तारा रस्त्यावर भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या गणेश शहा (40 वय) या पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार झाला असून, सांताक्रूझ पोलीस Santacruz Police Station त्याचा शोध घेत आहेत. Mumbai Juhu Tara Road Accident News

ही घटना शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता जुहू तारा रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयासमोर घडली. गणेश शहा हे कामानिमित्त बाहेर गेले असताना, जुहू कोळीवाड्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या एका दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघात होताच दुचाकीस्वार फरार झाला.

गणेश शहा यांच्या पत्नी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी परळ येथील केईएम रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यावेळी दुपारचे 3 वाजले असल्याने कुटुंबियांनी दुसऱ्या दिवशी त्यांना केईएममध्ये नेण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता शहा यांना पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि दुसऱ्या दिवशी, 2 ऑगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गणेश शहा हे नळ दुरूस्तीचे (प्लंबर) काम करत होते.

या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 125, 281 आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे उपचारातील विलंब आणि रस्ते अपघातातील निष्काळजीपणा हे मुद्दे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

vivek

Recent Posts