मुंबई : तीन वर्षाच्या मुलीला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पळवून नेले, पोलिसांनी अवघ्या तीन तासात केली अपहृत मुलीची सुटका

Mumbai Police Latest Crime News : दिपाली बबलू दास या महिलेने मुलीला जबरदस्तीने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. याबाबत मुलीची आई पुनम गुप्ता यांनी वरळी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देखील दिली.
मुंबई :- मुंबईच्या वरळी परिसरातील Mumbai Worli Crime प्रेम नगर या झोपडपट्टी परिसरातून तीन वर्षाच्या मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तीन तासात अपहृत मुलीची सुटका केली आहे. Mumbai Worli Kidnapping News दिपाली बबलू दास (40 वय, रा. प्रेम नगर वरळी नाका मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.

वरळी परिसरातील प्रेम नगर या झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या पूनम विनोद कुमार गुप्ता (32 वय) यांची तीन वर्षाची मुलगी नेहमीप्रमाणे राहत्या घराच्या बाहेर अंगणामध्ये गल्लीतील बोळामध्ये खेळत होती. आणि तिची आई पूनम मी घरात कामे करत होती. दुपारच्या सुमारास तिच्यासोबत खेळणारी मायनुर अबरार अहमद खान (10 वय ) हिने पुना मिला सांगितले की, तुमच्या मुलीला एका बाईने चॉकलेट देते असे सांगून जबरदस्ती गल्लीच्या बाहेर खेचत नेल्याचे सांगितले. त्यावेळी घाबरलेल्या पुनमने आपल्या नातेवाईकांना सांगितले आणि त्यानंतर मुलीचा शोध घेण्यासाठी प्रेम नगर, वरळी नाका, मद्रास वाडी, वरळी सी फेस या ठिकाणी शोध घेत असताना मुलीचा कोणताही प्रकारे ठाऊक ठिकाणी लागला नाही. त्यानंतर घरच्यांनी पोलीस वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम 137 दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती,पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी,अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग अनिल पारसकर ,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-3 दत्तात्रय कांबळे सहाय्यक पोलीस आयुक्त वरळी विभाग दत्तात्रय नाळे यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र काटकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रूपवते, महिला पोलीस उपनिरीक्षक उषा मस्कर, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव व पथक पोलीस शिपाई सावकार,घुगरे,खाडे, पोलीस हवालदार पाटील व दहशतवाद विरोधी पथकातील परब,कुंभार, पोलीस उपनिरीक्षक आळंदे, महिला पोलीस शिपाई खाके गावडे यांच्या वेगवेगळया टीम तयार करून गुन्हयाचे गांभीय लक्षात घेवुन त्यांना मुलीचा शोध घेण्याचे काम सोपवण्यात आले. पोलिसांनी मुलीचा शोध घेत असताना प्रेम नगर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गंगाराम लॉन्ड्री गल्ली येथील किराणा दुकानाच्या केवळ एका सीसीटीव्ही फुटेज मध्ये महिला मुलीला घेऊन जात असतानाचा व्हिडिओ पोलिसांना आढळला. पोलिसांनी तो व्हिडिओ संपूर्ण प्रेम नगर परिसरातील स्थानिक लोकांच्या मदतीने प्रसारित केला झोपडपट्टीमध्ये घरोघरी शोध घेऊन पोलिसांनी आरोपी महिला दिलीप बबलू दास तिचा शोध घेऊन अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलीची सुटका केली या संपूर्ण प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तिच्या विरोधात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलीला सुखरूप तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे.