महाराष्ट्र
Trending

Mulund Police : मुलुंड पोलिसांची ‘मिशन 24 तास’! – ‘फेक पोलीस’ बनून ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या टोळीला तातडीने बेड्या

Mulund Police Arrested Fake Police Officer : 71 वर्षीय वृद्धाला गंडा घालणारे मिरारोड, वसई आणि कुर्ला येथून जेरबंद; 6.24 लाखांचे सोन्याचे दागिने ‘शंभर टक्के’ हस्तगत; मुंबई पोलिसांची तत्पर कारवाई

मुंबई :- मुलुंड पोलीस ठाण्याच्या Mulund Police Station हद्दीत पोलीस असल्याची बतावणी करून एका 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला दिवसाढवळ्या गंडा घालणाऱ्या तीन धूर्त आरोपींना मुलुंड पोलिसांनी केवळ 24 तासांच्या आत अटक करून त्यांच्याकडून फसवणूक झालेली संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात अभूतपूर्व यश मिळवले आहे. मुंबई पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे ज्येष्ठ नागरिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. Mulund Police

दिनांक 2 डिसेंबर रोजी दुपारी मुलुंड पश्चिम येथील जटाशंकर डोसा रोडवर ही घटना घडली. फिर्यादी ज्येष्ठ नागरिक त्यांच्या कामासाठी गेले असताना, तीन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे खोटे सांगून त्यांच्यावर दबाव आणला. बोलण्यात गुंतवून त्यांनी फिर्यादींकडील सोन्याची चेन आणि दोन अंगठ्या, असे एकूण 6 लाख 24 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने काढून घेतले आणि पळ काढला.

फसवणुकीची तक्रार मिळताच मुलुंड पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपासचक्र फिरवले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करत पोलिसांनी आरोपींचा ठावठिकाणा शोधला.गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने मिरारोड पूर्व येथून आरोपी क्र. 1 तौफिक मोफिद सिध्दिकी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने वसई येथे लपलेल्या दुसऱ्या साथीदाराची माहिती दिली. पोलिसांनी तांत्रिक तपास करत रात्रीत आरोपी क्र. 2 सिमोन ग्रॅबिअल गोन्साल्विस याला वसईतून जेरबंद केले. या दोघांच्या माहितीवरून तिसरा आरोपी मोहम्मद शरीफ मुनिर अहमद सिध्दिकी याला कुर्ला परिसरातून अटक करण्यात आली.
या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी फसवणूक केलेले सोन्याचे दागिने 100 टक्के हस्तगत केले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांना कडक संदेश मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0