Mulund Bridge Collapsed : बेपर्वा ब्रिजकामाचा कहर! लोखंडी पिलर कोसळून कारचे नुकसान — कंत्राटदारांच्या हलगर्जीपणावर संताप

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्र मिरर विवेक राजेंद्र जगताप :- मुंबईत सुरू असलेल्या विकासकामांचा बोजवारा उडाल्याचं आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील ब्रिज कामादरम्यान कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसताना लोखंडी तुकडा थेट कारवर कोसळल्याने मोठा अपघात टळला, मात्र वाहनाचे नुकसान झाले. या घटनेमुळे कंत्राटदारांच्या निष्काळजीपणावर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
⚠️ बॅरिकेड नाही, सुरक्षा नाही — थेट वाहनावर लोखंडी तुकडा
भांडूप पश्चिम येथील धनेश बाबूराम यादव (वय ३१) हे १४ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री मित्रांसह मुलुंड परिसरातून परतत असताना पिलर क्र. २८ जवळ सुरू असलेल्या ब्रिज कामातून लोखंडी भाग त्यांच्या फॉर्च्युनर कारवर कोसळला.
विशेष म्हणजे त्या ठिकाणी ना बॅरिकेड्स, ना दिशा दर्शक फलक, ना सुरक्षा रक्षक — रस्ता मात्र सुरूच!
🚧 काम सुरू पण जबाबदारी कुणाची?
स्थळी उपस्थित कामगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार एस.पी.एस. कन्स्ट्रक्शन कंपनीचे कर्मचारी तेथे काम करत होते.
हलवली जात असलेली लोखंडी शिडी तुटून कारवर पडल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
⚖️ पोलीस तक्रार दाखल — निष्काळजीपणावर कारवाईची मागणी
घटनेनंतर धनेश यादव यांनी संबंधित कामगार व कंत्राटदारांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
“बेपर्वाईमुळे एखाद्याचा जीव गेला असता तर जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
🔥 विकासकाम की जीवाशी खेळ?
मुंबईत विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामांमध्ये
➡️ सुरक्षा नियमांचा बोजवारा
➡️ कंत्राटदारांची मनमानी
➡️ प्रशासनाची ढिलाई
यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
आता प्रश्न एकच — निष्काळजी कंत्राटदारांवर कठोर कारवाई होणार की पुन्हा एकदा प्रकरण दडपलं जाणार?


