•मुलुंडच्या वैशाली नगर परिसरात रविवारी घटना घडली असून या घटनांमध्ये सहा ते सात वाहनांचे मोठे नुकसान झाले ते प्रशासनामध्ये सांगण्यात आले आहे
मुंबई :- मुलुंडच्या वैशाली नगर परिसरात रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.भरधाव वेगात असलेल्या एका मोटारगाडीने सहा ते सात वाहनांना जबर धडक दिल्याची घटना रविवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. या घटनेनंतर मुलुंड पोलिसांनी पाठलाग करून मोटारगाडी चालकाला अटक केली असून पोलीस त्याच्याकडे याबाबत अधिक तपास करत आहेत.मोटारगाडी वेगात असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे ही घटना घडली आहे.
करण मोहिते (26 वय) हा भरधाव वेगात मोटारगाडी चालवत असल्याचे सांगण्यात आले आहे.गाडीवरील नियंत्रण सुटले त्यानंतर ही मोटारगाडी एका लोखंडी खांबावर जाऊन आदळली. घटनास्थळाजवळच मुलुंड पोलीस ठाण्याची बीट चौकी आहे. मोठ्या आवाजानंतर तेथे असलेले पोलीस कर्मचारी तत्काळ बाहेर आले. त्यांनी मोटारगाडी चालकाला थांबण्याचा इशारा दिला. मात्र पोलिसांना पाहून तो अधिक वेगात पुढे गेला.
पोलिसांना मोटारगाडी चालकावर संशय आल्याने त्यांनी तत्काळ त्याचा पाठलाग केला. मात्र घाबरलेल्या चालकाने आणखी काही वाहनांना धडक देत, पूर्व द्रुतगती मार्ग गाठला. अखेर विक्रोळी परिसरात पोलिसांनी चालकाला पकडून ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याची तपासणी केली असता, तो नशेत नसल्याचे समोर आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…