Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन, जनतेच्या तक्रारी ईमेलवर घेणार,(ncpspinparliment@gmail.com) ईमेल आयडी प्रसिद्ध
बारामती :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आवाहन केले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसला आलेले यश पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत याबाबत सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले आहे. तसेच, आता जनतेच्या प्रश्नासाठी त्यांच्या तक्रारी समस्या जाणून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी ई-मेल आयडी प्रसिद्ध करून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, जनतेचे समस्या प्रश्न मांडण्याकरिता ईमेल आयडी चा वापर करावा. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत ईमेल आयडी प्रसिद्ध केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की,
प्रति,
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व सेलचे राज्यप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांस…
सप्रेम नमस्कार,नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी विक्रमी यश संपादन केले याबद्दल सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. आपण सर्वांनी या निवडणूकीत पक्षाची विचारधारा आणि भूमिकेशी ठाम राहून एकजुटीने लढा दिला. आपण या निवडणूकीत केलेले काम मोलाचे आहे, याबद्दल पक्षाची कार्याध्यक्ष म्हणून मी आपले मनापासून आभार मानते. आपण मायबाप जनतेची सेवा, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिलांचा सन्मान तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी या संघर्षात सर्वस्व विसरुन सहभागी झाला. आपल्या सहभागामुळे आदरणीय पवार साहेबांनी सुरु केलेल्या या लढाईला बघता बघता एका लोकसंग्रामाचे रुप प्राप्त झाले. यामुळेच संसदेत आपले आठ खासदार आपणा सर्वांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण पाठविले. आपण सर्वांनी मिळून केलेल्या या कामगिरीचा मला सार्थ अभिमान आहे.
आपल्या सर्वांच्या साथीने पक्षपातळीवर एका संकल्पनेची सुरुवात करण्याचा माझा विचार आहे. आपणास माहितच आहे की, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांचा वारसा जोपासत आपण जनसेवेच्या मार्गाने चालत आहोत. यामध्ये कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये अशी आपणा सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. म्हणूनच राज्यातील कानाकोपऱ्यात अगदी ‘चांदा ते बांदा’ पर्यंतच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे.
आपल्या माध्यमातून संसदेत निवडून गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व खासदार जनहिताचे प्रश्न संसदेत मांडतील याची मला खात्री आहे. यासाठी मला आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. सत्ताधाऱ्यांना जनहिताचे प्रश्न विचारण्यासाठी प्रत्येक सेलच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी प्रत्येक सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाने अधिकृतरित्या तयार केलेल्या ncpspinparliment@gmail.com या ईमेल आयडीवर घडलेल्या घटनांचा सारांश आणि त्याचे प्रमुख पुरावे (कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ, ऑडीओ, इतर.) जोडून पाठवावे ही विनंती.
या संकल्पनेच्या माध्यमातून संसदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा आवाज बुलंद होण्यास तुमचा हातभार लागेल. पक्षाची ताकद, जनतेचा विश्वास आणि आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धिंगत होईल याचा मला ठाम विश्वास आहे. पक्षाच्या या बहुमोल कामगिरीत तुम्हा सर्वांचा निश्चितच सक्रिय सहभाग राहील याचा मला ठाम विश्वास आहे.
धन्यवाद.
आपली,
सुप्रिया सुळे
(राष्ट्रीय कार्याध्यक्ष)अशा आशयाचे ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…