Narayan Rane Health Update : नियमित वैद्यकीय चाचणीसाठी भरती; प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
मुंबई | भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे Naryan Rane यांना आज मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयाशी संबंधित काही समस्या जाणवत असल्याने तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
नियमित चाचणी की शस्त्रक्रिया?
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांना नियमित वैद्यकीय तपासणी (Routine Check-up) आणि हृदयाशी संबंधित उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. यापूर्वी मे 2022 मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. सध्या त्यांना काही दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले जाण्याची शक्यता असून, आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या जात आहेत.
“आता मी थकलोय…” राणेंचे ते भावनिक भाषण
नुकताच कोकण दौऱ्यावर असताना कणकवली येथे नारायण राणे यांचा सत्कार करण्यात आला होता. स्थानिक नगरपंचायत निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आयोजित या सोहळ्यात राणे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. ते म्हणाले होते की,
“आता मी थकलो आहे, अजून किती काम करणार? याला काहीतरी मर्यादा असायला हवी. माझी दोन्ही मुले (नितेश आणि निलेश) आता समर्थ आणि कर्तृत्ववान आहेत. त्यांना आता ‘नांदा सौख्य भरे’ असा माझा आशीर्वाद आहे.”
त्यांच्या या विधानानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने राजकीय वर्तुळातून आणि त्यांच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…