Kalyan News : कल्याणमध्ये अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या ‘इराणी ड्रग पेडलर’ला अटक

•कल्याणच्या आंबिवली, मोहने, अटाळी परिसरात एम डी ड्रग्ज सप्लाय आणि विक्री करत होता.
कल्याण :- कल्याणमध्ये अंमली पदार्थाची विक्री मोठ्याप्रमाणात वाढली आहे. याविरोधात पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याणच्या आंबिवली येथील अटाळी इराणी वस्तीमधून याप्रकरणी इराणी ड्रग पेडलरला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 यांच्या विशेष पथकाने कल्याणच्या आणि खडकपाडा पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली आहे.हाशमी जाफर हुसैन जाफरी, (वय 33 रा.जाणु पाटील चाळ, इराणी नगर, आंबिवली रेल्वे स्टेशन जवळ, अटाळी, ता. कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कल्याणजवळ आंबिवली परिसरातील इराणी वस्तीत एक एम डी ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती कल्याण खडकपाडा पोलिसांना मिळाली होती.
बंदरपाडा कडून शिवमंदिरकडे जाणाऱ्या कच्या गावठाण रोडवर, बंदरपाडा, या ठिकाणी आले असता ठिकाणी पोलीस पथकास रोडचे कडेला उभ्या असलेल्या ऍक्सेस स्कुटी आलेल्या इसमाच्या हालचाली संशयीत वाटल्या.चौकशी केली असता त्याच्याकडे 15 ग्रॅम एमडी ड्रग्स साठा आढळून आला आहे.एमडी ड्रग्स कुठून आणले आणि ते कोणाला विक्री करत होते या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत. आरोपीवर यापूर्वीही महात्मा फुले पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहे. तसेच मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
हि कारवाई अतुल झेंडे, पोलीस उप-आयुक्त. परिमंडळ-3, कल्याण, कल्याणजी घेटे, सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग, तसेच डॉ. अमरनाथ वाघमोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय नाईक महात्मा फुले पोलीस ठाणे, कल्याण प. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र ठोके, पोलीस शिपाई अमित शिंदे, खुशाल नेरकर, राहुल शिंदे पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 कल्याण विशेष कारवाई पथक, तसेच खडकपाडा पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, अंमलदार अनंत देसले, पोलीस शिपाई सतिष मुपडे यांनी केली आहे.



