Vasai Latest Robbery News : ‘नाश्त्या’च्या बहाण्याने केली लाखोंची चोरी; बनावट नंबरप्लेट आणि 100 CCTV फुटेजचा ‘पोलिसांचा मास्टरमाईंड’ तपास
वसई :- एखाद्या क्राईम थ्रीलर सिनेमात शोभावी अशी थरारक चोरी आणि त्याहूनही रोमांचक पद्धतीने त्याचा छडा लावत, 11 लाख 16 हजार 900 रुपये किमतीचे शुटिंग साहित्य (कॅमेरे) लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष ३, विरारच्या पोलिसांनी दमदार कामगिरी करत जेरबंद केले आहे. भिवंडी, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही फुटेजच्या ‘तांत्रिक विश्लेषणा’वर आधारित या तपासामुळे आरोपींना अखेर बेड्या ठोकण्यात यश आले. Vasai Latest Crime News
‘विश्वासघाताची स्क्रिप्ट’: नाश्त्याच्या बहाण्याने लाखोंचा ‘डल्ला’
दिनांक 22 जुलै 2025 रोजी सकाळच्या दरम्यान घडलेली ही घटना फिर्यादीसाठी धक्कादायक होती. अनोळखी आरोपींनी स्वतःची खरी ओळख लपवून फिर्यादींशी संपर्क साधला. एका दिवसासाठी शुटिंगचे साहित्य भाड्याने बुक करत त्यांनी फिर्यादींचा विश्वास जिंकला. फिर्यादी त्यांच्या कॅमेऱ्यांसह आरोपींच्या गाडीतून जात असताना, आरोपींनी विरारफाटा जवळील ‘जार हॉटेल’ येथे नाश्ता करण्याच्या बहाण्याने कार थांबवली. फिर्यादी हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी जाताच, आरोपींनी त्यांच्या 11 लाखांहून अधिक किमतीच्या शुटिंगचे साहित्य घेऊन पळ काढला. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात भा.न्या.स. कलम 316(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोलिसांची ‘टेक्निकल’ गुन्हेगारीविरुद्ध ‘फाइट’: प्रत्येक फुटेज महत्त्वाचं!
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा कक्ष-3, विरारच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. तपासात आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या वॅगनार कारची मूळ नंबरप्लेट बदलून बनावट नंबरप्लेट वापरल्याचे निष्पन्न झाले.
या आव्हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी भिवंडी, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे अतिशय बारकाईने विश्लेषण केले. प्रत्येक फ्रेम, प्रत्येक बारीक तपशील तपासला गेला, ज्यामुळे आरोपींचा ‘डिजिटल माग’ काढणे शक्य झाले. हे तांत्रिक कौशल्य पोलिसांसाठी ‘गेम चेंजर’ ठरले.
तांत्रिक माहितीच्या आधारे, पोलिसांनी रुद्र श्रीकांत कोळी (वय 20, रा. सुकापूर, पनवेल) आणि विवेक ऋषीकेश सिंग (वय 24, रा. सी वुड, नवी मुंबई) या दोघांना दिनांक 28 जुलै 2025 रोजी नेरुळ, नवी मुंबई येथून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, गुन्ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्ट झाला. पोलिसांनी या आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली वॅगनार कार देखील हस्तगत केली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन मांडवी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही उत्कृष्ट आणि थरारक कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, पोलीस हवालदार मुकेश तटकरे, सागर बारवकर, प्रशांत पाटील, राकेश पवार, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, पोलीस अंमलदार आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारडे, प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे (सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष-3) आणि सायबर पोलीस ठाणेचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…