Bhiwandi Crime News : गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, दोन मुख्य आरोपी अटकेत,3.70 लाखांचा साठा हस्तगत
भिवंडी :- तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या ‘कोरेक्स’ कफ सिरपच्या (Codeine Phosphate & Triprolidine Hydrochloride ONREX Cough Syrup) एका मोठ्या साठ्याचा भिवंडी गुन्हे शाखा घटक-2 च्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. काल,( 30 जुलै) रोजी केलेल्या या धडाकेबाज कारवाईत, सुमारे 3 लाख 74 हजार 400 रुपये किमतीच्या 1,920 ‘कोरेक्स’ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून, नशाखोरीच्या एका मोठ्या रॅकेटचा छडा लागण्याची शक्यता आहे. Bhiwandi Latest Crime News
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गुलजार नगर, गैबीनगर, भिवंडी येथे एका गाळ्यामध्ये ‘कोरेक्स’चा बेकायदेशीर साठा असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सपोनि राज माळी आणि त्यांच्या पथकाने तात्काळ सापळा रचून गोदामावर छापा टाकला. या छाप्यात अश्पाक अहमद मोहम्मद हसन मोमीन (वय 39, रा. गौरीपाडा, भिवंडी) आणि अब्दुलरजा अलीरजा सिद्दीकी (वय 25, रा. संजयनगर, भिवंडी) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून नशेत वापरल्या जाणाऱ्या ‘कोरेक्स’ कफ सिरपच्या मोठ्या प्रमाणातील बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
या आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम 8 (क), 22 (ब) सह सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 चे कलम 18 क, 18 अ, शिक्षा कलम 27 (ब) व 28 (अ), 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा घटक-2, भिवंडी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, यामागे आणखी मोठे हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अप्पर पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राज माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन भोईर, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चौधरी, सुनिल साळुंखे, पोलीस हवालदार सुदेश घाग, साबीर शेख, शशिकांत यादव, प्रशांत राणे, वामन भोईर, साबिर शेख, पोलीस शिपाई अमोल इंगळे, भावेश घरत, विजय कुंभार, पोलीस शिपाई रविंद्र साळुंखे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. या कारवाईमुळे भिवंडीतील नशाखोरीच्या रॅकेटला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…