Monsoon Assembly Session Update : पेपरफुटी बाबत विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
•पावसाळी अधिवेशनात पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी
मुंबई :- राज्यात पावसाळी अधिवेशन चालू आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मावळत्या सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प सादर केले आहे. अर्थसंकल्पना दोन शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधात दोन शेतकऱ्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. तसेच मुख्यमंत्री लाडके बहीण योजना अंतर्गत होणाऱ्या तरतुदीवरून सरकारला विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. विविध मुद्दे अधिवेशनात तापलेले असताना पुन्हा एकदा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
सोमवारी (01, जुलै) अधिवेशन चालू होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत पेपर फुटीचा मुद्दा सरकारच्या निदर्शनास आणून दिला आहे. विद्यार्थ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… बिन परीक्षा चा पेपर फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… पेपर फोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. पेपर फुटी संदर्भात कठोर कायदा करावा असे पोस्टर घेत विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी देत पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे.