Monsoon Assembly Session : “राम कृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी, विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडून घोषणाबाजी
•Monsoon Assembly Session विधान मंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या साठी आंदोलन केले
मुंबई :- विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर “राम कृष्ण हरी, शेतकरी फिरते दारोदारी” अशी घोषणा देत सरकारला शेतकऱ्यांच्या तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातात टाळ मृदुंग घेत रामकृष्ण हरी शेतकरी फिरते दारोदारी असे भजन गायले तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात पोस्टर घेत दूध उत्पादक शेतकऱ्याला न्याय द्या. असा फलक झलकवण्यात आला आहे. अनुदानित भीक नको शेतकऱ्यांना हक्काचे दर द्या, दूध भुकटी धोरण शेतकऱ्यांचे होते मरण.. असे पोस्टर घेत विरोधकांनी सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्याय बाबत प्रश्न विचारले आहे.