Monsoon Assembly Session : गाजर हलवा… सरकार घालवा.. पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकार विरुद्ध घोषणाबाजी
•पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न, विधिमंडळ चालू होण्यापूर्वीच विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरुद्ध घोषणाबाजी..
मुंबई :- राज्यात पावसाळी अधिवेशन चालू आहे. पहिल्या दिवसापासूनच विरोधकांनी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालू आहे. अधिवेशन चालू होण्यापूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली आहे. गाजर हलवा… सरकार घालवा.. असा नारा विरोधकांकडून देण्यात येत आहे.
राज्याचे अतिरिक्त अंतिम अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे मांडणार आहे. तत्पूर्वी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकार विरुद्ध विरोधकांनी चांगलीच घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. आज विरोधी पक्षांनी म्हणजेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हातात गाजर घेऊन सरकारविरोधाचे बॅनर हातात घेऊन घोषणाबाजी करत आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार ,जितेंद्र आव्हाड, बंटी पाटील, सचिन अहिर यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.