Monsoon Assembly Session : खिशात नाही आणा… मला बाजीराव म्हणा… विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
•महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधान मंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी
मुंबई :- राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली आहे. “खिशात नाही आणा, आणि मला बाजीराव म्हणा…” अशी घोषणाबाजी करत सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाने वर राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांनी आज चांगलाच समाचार घेतला आहे.
तिजोरीत खळखळाट अन् थापांचा सुळसुळाट, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हा महायुतीचा ध्यास, भाऊ म्हणून दाखवलंय महिलांना योजनेचा भूल, महिला करतील यांना निवडणुकीत गुल असे आशयाचे पोस्टर घेऊन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दस का घेतल्याने विधानसभेला मस्का लावून मतदारांना गाठण्यासाठी अर्थसंकल्पानेतून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आहे असा टोला राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी लावला आहे. आजच्या सत्रात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाणार आहे.