Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला ‘फसवणुकीचा खजिना’ | गुन्हे शाखेच्या कक्ष-3 कडून दोन सराईत आरोपींना बेड्या | लॅपटॉप, मोबाईलसह लाखांची रोकड जप्त
मुंबई :- मुंबईतील मस्जिद बंदर म्हणजे व्यापाराचे केंद्र, पण याच गर्दीचा फायदा घेत काही लोक सायबर गुन्ह्यांतील रकमांची विल्हेवाट लावण्याचे ‘हब’ चालवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सायबर फसवणुकीतून लूटलेला पैसा सुरक्षितपणे वळवण्यासाठी 9 बनावट कंपन्या आणि 55 बँक खात्यांचा वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी मांडवी परिसरातील एका कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला आणि या ‘डिजिटल दरोड्या’चा खेळ खऱ्या अर्थाने उघड झाला.
असे विणले होते बँक खात्यांचे जाळे
या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांनी इतर फरार आरोपींच्या मदतीने एक मोठा कट रचला होता. त्यांनी विविध सर्वसामान्य लोकांच्या आधारकार्ड आणि पॅनकार्डचा गैरवापर करून ऑनलाईन पद्धतीने 9 बनावट कंपन्यांची नोंदणी केली. या कंपन्यांच्या नावे 55 वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडण्यात आली. देशभरात जिथे जिथे सायबर फसवणूक व्हायची, तिथली रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जायची आणि तिथून ती पुन्हा इतरत्र वळवून गायब केली जायची. प्राथमिक तपासात या खात्यांमधून करोडो रुपयांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, या आकड्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
छापा आणि मुद्देमालाची जप्ती
गुन्हे शाखेच्या कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सदानंद येरेकर यांच्या पथकाने अत्यंत गोपनीयतेने ही कारवाई पार पाडली. अटक करण्यात आलेले आरोपी 46 आणि 42 वर्षांचे असून, ते या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन पाहत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 अत्याधुनिक मोबाईल हॅण्डसेट, 3 लॅपटॉप, 2 पेन ड्राईव्ह आणि विविध बँकांचे चेकबुक जप्त केले आहेत. तसेच, घटनास्थळावरून 1 लाख 3 हजार 880 रुपयांची रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.
मोठ्या माशांचा शोध सुरू
पोलीस आयुक्त देवेन भारती आणि सह आयुक्त लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या तपासात आता आणखी काही धक्कादायक नावे समोर येण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यात केवळ हे दोनच आरोपी नसून, त्यांचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फसवणूक झालेल्या रकमांचे मूळ शोधण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू असून, या रॅकेटमुळे सायबर फसवणुकीच्या अनेक प्रलंबित गुन्ह्यांची उकल होण्याची चिन्हे आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…