•माजी नगरसेवकांचा युतीला पाठिंबा; ठाकरे म्हणाले, “सर्वांचा विश्वास घेऊनच निर्णय!”
मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि मनसे युतीचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. माजी नगरसेवकांनी मनसेसोबत युती केल्यास फायदा होईल, असा सूर स्पष्टपणे लावला असतानाच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणताही निर्णय हा “सर्वांना विश्वासात घेऊनच” होईल, असा पुनरुच्चार करत राजकारणातले समतोल साधला आहे.
ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांची बैठक बुधवारी पार पडली. बैठकीत निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा झाली. मनसेसोबत युतीचा मुद्दा चर्चेत आला आणि अनेक माजी नगरसेवकांनी या युतीस अनुकूलता दर्शवली. यावर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील एकी आणि सल्लामसलतीला प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.
निवडणूक येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होण्याची शक्यता असून शिवसेना भवनात विशेष निवडणूक कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की, “शिवसेना भवन हे जनतेच्या प्रश्नांचं केंद्र बनवा आणि या निवडणुकीत भगवा पुन्हा फडकवा!”
दरम्यान, राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीमुळे मनसे-भाजप समीकरणावर नवे अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि मनसे युती झाली, तर मुंबईतील राजकीय गणितं पूर्णपणे बदलण्याची चिन्हं आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…