उद्धव ठाकरे यांनी “बिन शर्ट”पाठिंबा अशी खोचक टीका, मनसेकडून प्रत्युत्तर
•Maharashtra Politics उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे
मुंबई :– शिवसेना पक्षाचा काल 58 वा वर्धापन दिवस होता. या निमित्ताने ठाकरे गटाच्या मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एकमेव आमदार असलेले राजू पाटील सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांनी आता उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी कालच्या भाषणात खोचक शब्दांत निशाणा साधला. “या निवडणुकीत आपलं कोण आणि परकं कोण हे दिसलं. काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून बिन शर्ट पाठिंबा दिला. अरे उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट. उघड पाठिंबा दिला. म्हणजे बिनशर्ट ना, बरोबर की चूक आहे”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लगावला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांचे टीका
“कंबरेचं काढून डोक्याला गुंडाळलेले ‘शर्त” आणि ‘शर्ट’ असले फुटकळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजींनाच पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढलं होतंत?” असे खोचक ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. दरम्यान, काही लोकांनी तर उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन शर्ट’ पाठिंबा दिला, उघड पाठिंबा दिला असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला होता.
मनोज चव्हाण मनसे नेते यांचे ट्विट काय?
बिन-शर्ट बोलणारे उद्धव ठाकरे हे विसरलेत कि लोकसभेत मराठी माणसाने त्यांची पॅन्ट काढली आहे…फक्त आणि फक्त मुस्लिम मतांमुळे जिंकलेले उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वंशज असू शकतात का?
संतोष धुरी यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली
उद्धव ठाकरे तुमचा मुलगा आदित्य ठाकरेला वरळीत याच राजसाहेब ठाकरेंच्या मनसेने “बिनशर्ट” पाठिंबा दिला होता..पण तुम्ही तो विसरला वाटत ..तेव्हा जर हाच “बिन शर्ट “पाठिंबा दिला नसता तर आदित्य तेव्हाच उघडा पडला असता…..!