MNS Raj Thackeray Manifesto: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध, राज ठाकरे यांचे काय व्हिजन?
MNS Raj Thackeray Manifesto: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तर महायुती आणि महा विकास आघाडी यापूर्वीच आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून अनेक मोठी आश्वासने दिली आहेत.
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी ते म्हणाले की, सर्व पक्षांचा जाहीरनामा लाँच झाला असून आज मी मनसेचा जाहीरनामा लाँच करत आहे. MNS Raj Thackeray Manifesto किती प्रती छापल्या आहेत, याची माहिती निवडणूक आयोगाला द्यायची आहे.ही माहिती देणे हास्यास्पद आहे. आता 17 नोव्हेंबरला होणाऱ्या सभेला मला उपस्थित राहता येणार नाही, दीड दिवस बाकी असून प्रशासन परवानगी देण्यास विलंब करत आहे, त्यामुळे त्या वेळेत तयारी करता येणार नाही. राज ठाकरे RaJ Thackeray म्हणाले की, 17 नोव्हेंबरला मी ठाणे आणि मुंबईत सभा घेणार आहे.
पिण्याचे पाणी, महिलांची सुरक्षा, शिक्षण, रोजगार, वीज, कचरा व्यवस्थापन, इंटरनेटची उपलब्धता, खेळाचे क्षेत्र आणि राज्यातील उद्योग वाढवणे आदी मुद्द्यांचा समावेश असलेल्या ‘आम्ही हे करू’ या शीर्षकाचा जाहीरनामा राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला. तसेच मराठी अस्मिता, मराठी साहित्य, गड आणि किल्ले संवर्धन, सर्वत्र मराठीला स्थान.आणखी एक पुस्तकही आहे, ज्याचं नाव आहे ‘कोण कोणते आंदोलन केले आणि काय काय केले आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यातील प्रमुख 10 मुद्दे
- मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान
- दळणवळण वीज पाण्याचे नियोजन
- सक्षम स्थानिक प्रशासन प्रकल्पासाठी लोकसहभाग
- राज्याची औद्योगिक प्रगती
- मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार
- गडकिल्ले संवर्धन
- कृषी आणि पर्यटन क्षेत्राचा विकास
- राज्याचे करत धोरण सुधारणार
- डिजिटल प्रशासनाला प्रोत्साहन
- घनकचरा व्यवस्थापन आणि मलनि:सारण