
MNS Invite Aditya Thackeray AND Ashish Shelar : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर येत्या 26 एप्रिल रोजी मनसे प्रतिसभागृह भरवणार आहे. मनसेच्या या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नेते आदित्य ठाकरे हे यांनाही निमंत्रण
मुंबई :- मुंबई मराठी पत्रकार संघात हे प्रतिसभागृह भरविण्यात येणार असून यासाठी मनसेने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे.मुंबई महापालिकेच्या धर्तीवर येत्या 26 एप्रिल रोजी मनसे प्रतिसभागृह भरवणार आहे. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेचे लक्षवेधनाकरिता हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात मुंबई शहरातील सर्व आमदारांना निमंत्रित केल्याचे म्हटले जात आहे. मंत्री आशिष शेलार यांना ही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.
मुंबई महापालिकेची मुदत संपून तीन वर्षे झाली असून मुंबई महापालिका सभागृहाची बैठक झालेली नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.राज्यात सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र येणार असल्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आल्याने या चर्चेला उधाण आले आहे.