Navi Mumbai MNS Latest News : ‘महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू देणार नाही’ म्हणत अमित ठाकरेंनी केला लोकार्पण सोहळा; ‘पहिली राजकीय केस’ शिवछत्रपतींसाठी लढणार
नवी मुंबई :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांचे सुपुत्र अमित ठाकरे Amit Thackeray यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. नेरूळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन करताना जमावबंदीचे उल्लंघन, परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी नेरूळ पोलिसांनी अमित ठाकरेंसह सुमारे 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पुतळा उद्धाटन आणि अमित ठाकरेंची भूमिका
या पुतळ्याचे उद्घाटन करताना अमित ठाकरे यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात, शिवछत्रपतींच्या भूमीत महाराजांचा हा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही!”
पुतळा तब्बल चार महिने ‘लोकार्पणासाठी नेता मिळत नाही’ म्हणून फाटलेल्या कापडाने झाकून ठेवल्याबद्दल त्यांनी टीका केली. “महाराजांच्या सन्मानासाठी पुढे येणं ही आमची जबाबदारी होती आणि आम्ही ती पार पाडली. त्यामुळे आजपासून महाराजांचा हा पुतळा विधीवत पूजेसह नवी मुंबईकरांसाठी दर्शनाकरिता खुला असेल,” असे त्यांनी जाहीर केले.
‘पहिली राजकीय केस’ शिवछत्रपतींसाठी
या कारवाईनंतर अमित ठाकरे यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये आपले परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, “माझी पहिली राजकीय केस शिवछत्रपतींसाठी लढण्याची असेल, तर मला त्याचा आनंदच होईल.”
निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणाऱ्यांना आणि शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणाऱ्यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही, हे महाराष्ट्रात घडणे लाजिरवाणे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मनसेने केलेला हा आक्रमक पवित्रा आणि त्यानंतरची कायदेशीर कारवाई यामुळे नवी मुंबईतील राजकारण तापले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…