“चला आरशात पाहू या…”, मनसे नेते संदीप देशपांडे यांचे ट्विट, ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा
MNS Member Sandeep Deshpande Shared Tweet : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे जुने व्हिडिओ शेअर करत ठाकरेंवर टीका
मुंबई :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी Lok Sabha Election पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांना बिनशर्त पाठिंबा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray गटाच्या वतीने राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे Sandeep Deshpande यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘चला आरशात पाहू या’ अशा पद्धतीच्या पोस्टची एक मालिकाच त्यांनी समोर मांडली आहे. या माध्यमातून त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांचे अनेक जुने व्हिडिओ एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून समोर आणले आहेत. MNS Member Sandeep Deshpande Shared Tweet
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. वास्तविक मनसे देखील महायुतीसोबत सत्तेत सहभागी होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे महायुती सोबत येतील अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, आपण गुढीपाडव्याच्या मेळाव्यातच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. त्यानुसार गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, ते महायुतीत सहभागी झाले नाहीत.
संदीप देशपांडे यांनी केलेले आरोप पहा…
संदीप देशपांडे यांनी एका पोस्टमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकांचा उल्लेख केला आहे. यात ते म्हणतात की,
- 2009 – भाजप चांगले, काँग्रेस – राष्ट्रवादी वाईट
- 2014 – भाजप वाईट म्हणून युती तोडून वेगळे लढले आणि निवडणुकी नंतर परत भाजप चांगले
- 2019 – विधानसभा लढताना भाजप चांगले, कॉग्रेस-राष्ट्रवादी वाईट आणि निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी चांगले, भाजप वाईट
- 2022 – उध्दव ठाकरेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक चांगले, शिंदेंना पाठिंबा देणारे शिवसैनिक वाईट