मुंबई
Trending

MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठी मागणी, मराठी चित्रपटासाठी स्वातंत्र सेन्सर बोर्डची…..

MNS Latest News : मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. पक्षाच्या मागणीवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती करणार आहे.

मुंबई :- राज्यातील महानगरपालिका निवडणुकीपूर्वीच खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्वीच राज ठाकरे Raj Thackeray यांच्या मनसे पक्षाकडून पुन्हा एकदा मराठी कार्ड खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Marathi Film Industry मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे नेहमी अग्रस्थानी असलेल्या आता त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी पद्मभूषण नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित सिनेमाच्या परीक्षण करण्यासाठी सेन्सॉर बोर्ड कडे पाठवण्यात आले होते त्यावेळी त्यांच्या कवितेवर आणि त्यांच्या चित्रपटावर सेन्सॉर कडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते त्यावेळी चांगलाच गोंधळ झाला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर Amay Khopkar यांनी मराठी सिनेमे साठी स्वातंत्र्य सेन्सॉर निर्मिती करावी अशी मागणी केली आहे.

अमेय खोपकर यांनी एक्सवर ट्विट करत म्हणाले की,मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्डाची नितांत आवश्यकता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने ही मागणी होत आहे पण सरकारने याची दखल घेतलेली नाही. मराठी चित्रपटनिर्मात्यांची नेमकी काय मागणी आहे, यासंदर्भात सविस्तर निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना देत आहोत. महाराष्ट्र शासनाला या गंभीर विषयावर तातडीने विचार करुन शक्य तितक्या लवकर कार्यवाही करण्याची आमची विनंती आहे. सेन्सॉर बोर्डाकडून मराठी चित्रपटांना दिली जाणारी वागणूकही चीड आणणारी आहे. सेन्सॉर बोर्डाकडून होणाऱ्या विलंबामुळे मराठी चित्रपटांचं नुकसानच होत आहे. केवळ स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड नसल्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्याचा सामना गेली अनेक वर्षं निर्मात्यांना करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने याबद्दल गांभीर्यपूर्वक विचार करावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0
20:16