•Raj Thackeray Party MNS 3rd Candidate List महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने 13 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा पक्ष नवनिर्माण सेनेने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीतील 13 उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत.
मनसेच्या तिसऱ्या यादीत अमरावतीमधून पप्पू ऊर्फ मंगेश पाटील, नाशिक पश्चिममधून दिनकर धर्माजी पाटील, अहमदपूर-चाकूरमधून नरसिंग भिकाणे, परळीतून अभिजित देशमुख, विक्रमगडमधून सचिन रामू शिंगडा, भिवंडीतून वनिता शशिकांत कथुरे,यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमधून नरेश कोरडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच मनसेने शहादामधून आत्माराम प्रधान, वडाळ्यातून स्नेहल सुधीर जाधव, कुर्ल्यातून प्रदीप वाघमारे, ओवळा-माजिवडामधून संदीप पाचंगे, गोंदियातून सुरेश चौधरी आणि पुसदमधून अश्विन जैस्वाल यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यापैकी 16 जागा मुंबईत आहेत. या यादीत पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…