मुंबई
Trending

MLA Sanjay Gaikwad : “वरणातून विषाचा वास!” – आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीनमध्ये थेट राडा!

MLA Sanjay Gaikwad : “शिळा भात, सडलेलं वरण – आमच्या स्टाइलने उत्तर दिलं!” गायकवाडांचा संतप्त इशारा

मुंबई | महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय गायकवाड MLA Sanjay Gaikwad यांनी काल रात्री आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये थेट राडा केला.निकृष्ट, सडलेलं जेवण मिळाल्याने संतप्त झालेल्या आमदारांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

गायकवाड म्हणाले, “मी मुंबईत गेली साडेपाच वर्षे येतो आहे. सहसा कधी बाहेर जेवत नाही. मात्र, काल रात्री जे झालं ते पचवणं अशक्य होतं.”
त्यांनी रात्री 9.30 वाजता डाळ, भात, चपाती मागवली. “पहिला घास घेताच घाणेरडं वाटलं, दुसरा घास घेताच उलटी झाली. वरणाला सडलेल्या पदार्थासारखा वास येत होता, शिळा भात दिला होता.”

गायकवाड यांनी असा आरोप केला की, “हे फक्त आमदाराच्या जिवाशी नाही, तर शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या जिवाशी खेळ आहे. कोणाच्या जेवणात सुतळी तर कोणाच्या जेवणात पाल मिळते!”

ते पुढे म्हणाले, “आम्ही अनेकदा समज दिली, पण हे लोक काहीच ऐकत नाहीत. आता आमच्या स्टाइलने उत्तर द्यावं लागेल. हे चार-पाच दिवसांचं जेवण आहे. विषासारखा वास आहे. वारंवार सांगूनही सुधारणा होत नसेल, तर गय करणार नाही.”

गायकवाड यांनी स्पष्टपणे प्रशासनावर बोट ठेवलं आहे. “दहा दिवसांपूर्वीचा शिळा भात आणि वरण आमदार निवासात दिलं जातं? ही पूजा करायची का अशा कॅन्टीनवाल्यांची?” असा रोष त्यांनी व्यक्त केला.या प्रकरणावर सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कॅन्टीन व्यवस्थापन यांची काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0