नागपूर

MLA Sandip Joshi : नागपुरात भाजपला घरचा आहेर! मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच दूषित पाणीपुरवठा; आमदार संदीप जोशी आक्रमक

MLA Sandip Joshi On Nagpur BMC : महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, आयुक्तांना थेट आंदोलनाचा इशारा

नागपूर :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असतानाच नागपूरमध्ये भाजपला त्यांच्याच एका आमदाराकडून घरचा आहेर मिळाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील दूषित पाणीपुरवठ्यावरून आमदार संदीप जोशी Sandip Joshi यांनी महापालिका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून ही समस्या त्वरित सोडवण्याची मागणी केली असून, अन्यथा नागरिकांसह कार्यालयात धडक देण्याचा इशारा दिला आहे.

नागपूरमधील स्वावलंबीनगर आणि दीनदयालनगर परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नागरिकांना दुर्गंधीयुक्त, गढूळ आणि आरोग्यास धोकादायक पाणी मिळत आहे. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार संदीप जोशी यांनी केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही परिस्थिती असेल, तर शहराच्या इतर भागांत काय चालू असेल याची कल्पनाच करवत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘जर या गंभीर समस्येची दखल घेतली नाही, तर मी परिसरातील जनतेसह 7 ऑगस्ट रोजी स्वतः आयुक्तांच्या कार्यालयात धडक देईन. यावेळी नागरिकांच्या रोषाला आयुक्तांना सामोरे जावे लागेल आणि लोकांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनाची असेल.’

नागपूर महापालिकेत अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातीलच पाणी समस्येवर त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने घेतलेली आक्रमक भूमिका भाजपची कोंडी करणारी आहे. या पत्रातील ‘तुम्ही गप्प बसलात, म्हणून आम्हीही गप्प बसू, असा गैरसमज करू नका,’ या स्पष्ट इशामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपवरही दबाव वाढला आहे. या गंभीर समस्येवर महापालिका काय तोडगा काढते आणि भाजप पक्ष यावर काय भूमिका घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

42 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago