MLA Pravin Darekar : खासदार श्रीकांत शिंदे यांना कोणती ऑथॉरिटी नाही ; आमदार Pravin Darekar
MLA Pravin Darekar On Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर असताना, खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली, यावरून भाजप नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वर टीका केली.
अमरावती :- श्रीकांत शिंदे Shrikant Shinde हे ऑथॉरिटी नाहीत. दिल्लीचे नेतृत्वच उमेदवारांची नावे ठरवणार असे विधान भाजप नेते प्रवीण दरेकर MLA Pravin Darekar यांनी केले आहे. नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये आपल्या पक्षाच्या एका उमेदवाराची घोषणा करून टाकली आहे. नाशिक दौऱ्यावर गेलेल्या श्रीकांत शिंदे यांनी पुन्हा एकदा हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे स्पष्ट केले आहे. यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीकांत शिंदे हे ऑथोरिटी नाहीत. उमेदवारांच्या नावांचा अंतिम निर्णय हा दिल्लीचे नेतृत्वच घेईल. तिन्ही पक्षाच्या सुसंवादातून एकत्र निवडणूक होईल. कुठेही विसंवाद होणार नाही. ज्या जागा त्यांना वाटतात, त्या जागा ते मागतायत. ज्या जागा योग्य असतील त्या त्यांना मिळतील” असे दरेकर यांनी स्पष्ट केले. MLA Pravin Darekar On Shrikant Shinde
बैल गेला आणि झोपा केला…जेव्हा उद्धव ठाकरेंनी फिरायला पाहिजे होतं, तेव्हा ते घरात बसले. अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना मातोश्री मधून बाहेर पडले नाहीत. जेव्हा शिवसैनिकांशी संवाद साधायला पाहिजे होता तेव्हा साधला नाही. अख्खी शिवसेना एकनाथ शिंदेंच्या सोबत गेली, तेव्हा त्यांना जाग येते. परंतु आता जाग येऊन त्यांच्या हाताला काहीच लागणार नाही” अशा शब्दात भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ-वाशिम दौऱ्यावर खोचक टीका केली. MLA Pravin Darekar On Shrikant Shinde