क्राईम न्यूजठाणेमुंबई

Thane Police News : ठाणे पोलीस आयुक्तालायंतर्गत दोन दिवसात 1031 तक्रारींचे निराकरण

ठाणे तक्रार निवारण : या उपक्रमात 1730 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1031 तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.

ठाणे :- ठाणे शहरासह आजूबाजूच्या शहरांमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचप्रमाणे बेकायदेशीर अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. यामधून प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांचा नाहक त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे शहरातील गुन्हेगारी मध्ये वाढ होते.त्यात पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस Thane Police आयुक्तालयात शनिवार 3 आणि रविवार 4 मे रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात 1730 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1031 तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Thane Police Latest News

ठाणे पोलीस आयुक्तालायांतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शनिवारी “महिला तक्रार निवारण दिनाचे” आयोजन केले जाते. परंतु राज्य सरकारच्या 100 दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. तक्रार निवारण दिनाच्या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयातील 821 अर्जांची तात्काळ अर्जदारांच्या समक्ष निर्गती करण्यात आली आहे.

ठाणे शहर पोलीसांनी अर्जदारांना प्रत्यक्ष बोलावून जागच्या जागी तक्रारीचे निरसन व कृती केल्याने अर्जदारांनी व नागरिकांनी समाधान व्यक्त करून ठाणे शहर पोलीसांचे विशेष आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0